गडचिरोली – इंद्रावती नदीत प्रवासी नाव बुडाली, 3 जण बेपत्ता

मंगळवारी संध्याकाळी गडचिरोली जिल्ह्यातील इंद्रावती नदीमध्ये नाव बुडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या बचाव पथकाने धाव घेतली.

या पथकाने 13 जणांना वाचवलं असून ते सुखरूप आहेत. मात्र 3 जण अजून बेपत्ता असून यात दोन महिलांचा समावेश आहे.

river-indravati

मंगळवारी सकाळी सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली गावातील 15 महिला-पुरुष धार्मिक कार्यक्रमासाठी इंद्रावती नदीतून दोन नावेच्या साहाय्याने छत्तीसगड राज्यातील अटूकपल्ली येथे जाण्यासाठी निघाले होते. कार्यक्रम आटपून सायंकाळी परत येतांना नदीत नाव बुडाली.

rescue-team-member-indravat

यातील काही जणांना पोहता येत असल्याने ते पाण्याबाहेर निघाले. ज्यांना पोहता येत नव्हते ते पाण्यात गटांगळ्या खात होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचून नागरिकांना वाचवण्यास सुरुवात केली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.

indravati-river-bank

पोलीस आणि स्थानिकांनी मिळून बोटीतून प्रवास करणाऱ्या एकूण 13 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. बुधवारी सकाळपासून वन विभाग, ग्रामस्थ आणि पोलिसांकडून बेपत्ता असणाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या