इंदुरीकर महाराजांविरोधात तृप्ती देसाई आक्रमक, कडक बंदोबस्तात दिलं निवेदन

618
trupti-desai

कीर्तनकार हभप इंदुरीकर महाराज यांच्या विधानावरून गोंधळ उडाल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांच्या विरोधात निवेदन दिले आहे. तृप्ती देसाई यांच्या या निर्णयानंतर त्यांना काही धमक्या आल्या. तसेच नगरमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी येत असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आली.

मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये तृप्ती देसाई या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचल्या. प्रभारी पोलीस आयुक्त सागर पाटील यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

या आधी नगर येथे येत असताना देसाई यांच्या आसपास साधारण सात ते आठ गाड्यांचा ताफा आणि पोलीस सुरक्षा देण्यात आली होती. सुपा येथे आल्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले.

आपली प्रतिक्रिया द्या