INDvsNZ T20 हिंदुस्थानचा किवींवर सात गडी राखून विजय

1028
 • हिंदुस्थानचा न्यूझीलंडवर सात गडी राखून विजय
 • 133 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आता फक्त काही धावांची गरज आहे.
 • इश सौधीच्या गोलंदाजीवर टिम साऊदीला झेल देत श्रेयस अय्यर बाद
 • हिंदुस्थानला तिसरा धक्का
 • या सामन्यात सलामीला उतरलेला फलंदाज लोकेश राहुल यांचं अर्धशतक पूर्ण झालं आहे.
 • टिम साऊदीच्या गोलंदाजीवर सीफर्टकडे झेल देऊन विराट कोहली बाद
 • हिंदुस्थानला दुसरा धक्का बसला असून विराट कोहली झेलबाद झाला आहे.
 • दुसऱ्या विकेटसाठी विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची फलंदाजी
 • पहिल्याच षटकात रोहित शर्मा रॉस टेलरकडून झेलबाद
 • हिंदुस्थानला पहिला धक्का बसला आहे.
 • रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोघे सलामीला उतरले आहेत.
 • हिंदुस्थानच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे.
 • हिंदुस्थानसमोर विजयासाठी आता 133 धावांचं लक्ष्य आहे.
 • 20 षटकांअखेर न्यूझीलंडचा डाव 5/132 धावांवर आटोपला आहे.
 • न्यूझीलंडच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.
 • रॉस टेलर आणि टिम सीफर्ट यांची पाचव्या विकेटसाठी भागीदारी
 • 14 षटकांनंतर 4 विकेट्सच्या बदल्यात न्यूझीलंडच्या धावफलकावर 90 धावा
 • 13व्या षटकात जडेजाच्या चेंडुवर युजवेंद्र चहलकडे झेल देऊन केन विल्यमसन बाद
 • अकराव्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ग्रँडहोम बाद
 • शिवम दुबेच्या चेंडुवर विराट कोहलीकडे झेल देऊन कॉलिन मुनरो बाद
 • नवव्या षटकात 68 धावसंख्येचा टप्पा गाठताना न्यूझीलंडला दुसरा धक्का
 • न्यूझीलंडचा धावफलक 50 धावांवर एक बळी
 • शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर मार्टिन गप्टील झेलबाद.
 • कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्टील हे दोघे सलामीचे फलंदाज म्हणून उतरले आहेत.
 • न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
 • नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे.
 • हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या