
सामना ऑनलाईन । मुंबई
कसोटी मालिकेत विंडीजचा फडशा पाडल्यानंतर एक दिवसीय मालिकेच्या तयारीत व्यग्र असणाऱ्या टीम इंडियाला धक्का बसला आहे. पदार्पणाच्या कसोटीमध्ये दुखापतीमुळे मैदान सोडून जावे लागलेला वेगवाग गोलंदाज शार्दूल ठाकूर विंडीजविरुद्ध होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन एक दिवसीय सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात शार्दूलच्या जागी उमेश यादवची वर्णी लागली आहे.
बीसीसीआयने मंगळवारी एक अधिकृत परिपत्रक काढत शार्दूल दुखापतीमुळे विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकणार असल्याचे जाहीर केले. त्याच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. विंडीजविरुद्ध 21 ऑक्टोबरपासून एक दिवसीय मालिका सुरू होणार असून पहिला सामना गुवाहाटी येथे होणार आहे.
UPDATE: Umesh Yadav to replace Shardul Thakur in India’s ODI squad. #INDvWI
Details – https://t.co/rT7aAeFhSZ pic.twitter.com/8AnszjuHOj
— BCCI (@BCCI) October 16, 2018
पहिल्या दोन वन डे साठी हिंदुस्थानचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, अंबाती रायडू, मनीष पांडे, धोनी (यष्टीरक्षक), ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, उमेश यादव.
हिंदुस्थान वि. वेस्ट इंडिज वन डे मालिका –
पहिला सामना : 21 ऑक्टोबर (गुवाहाटी)
दुसरा सामना : 24 ऑक्टोबर (विशाखापट्टणम)
तिसरा सामना : 27 ऑक्टोबर (पुणे)
चौथा सामना : 29 ऑक्टोबर (मुंबई)
पाचवा सामना : 1 नोव्हेंबर (तिरुवनंतपुरम)


























































