इन्फिनिक्सद्वारे ‘एस 5 लाईट’ स्मार्टफोन लॉन्च

483

ट्रॅशन समुहाचा प्रीमियम ब्रॅंड इन्फिनिक्सने एस 5 चा नवीन मॉडेल ‘एस 5 लाइट’ हिंदुस्थानी बाजारात लॉन्च केला आहे. या मोबाईलमध्ये 6.6 इंच एचडी+स्क्रीन, 16 एमपी एआय ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16 एमपी इन-डिस्प्ले सेल्फी, 4 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज आणि 4000 एमएएचची भली मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

एस 5 लाइट हा आधुनिक अँड्रॉइड 9.0 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. जे एक्सओएस 5.5चीता लेयरद्वारा पॉवर्ड आहे. यामुळे हा फोन अधिकच जलद, व वापरण्यास सुलभ बनतो. शिवाय त्यात एक डिजिटल वेल-बीइंग फीचर आहे, ज्याच्या मदतीने यूझर आपल्या डिजिटल लाइफस्टाइलवर रियल-टाइममध्ये देखरेख ठेवू शकतो. कंपनीने याची किंमत 7,999 रुपये इतकी ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या