पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवर केंद्रीय मंत्री म्हणाले ‘ही तात्पुरती स्वरुपाची महागाई’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पेट्रोल डिझेलेच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु ही तात्पुरती स्वरुपाची महागाई आहे असे मत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले आहे. तसेच सरकार गरीबांसाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, सध्या सामान्य जनतेला महागाईच्या झळा पोहोचत आहेत. सरकारलाही सामान्य जनतेची चिंता आहे. ही महागाई तात्पुरत्या स्वरुपाची आहे. केंद्र सरकार लवकरच या महागाईवर नियंत्रण मिळवेल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला.

तसेच आपण 80 पेट्रोलियम उत्पादन आयात करतो त्यामुळेच पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचे त्यांने सांगितले. गेल्या दोन वर्षात पेट्रोलियम क्षेत्रात हवी तशी गुंतवणूक झालेली नाही, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. असे असले तरी केंद्र सरकारने गरीबांसाठी योजना राबवल्या आहेत. देशात 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. ही महागाई तात्पुरती असून सरकार ती कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत असेही प्रधान म्हणाले.