महागाईने गाठला 8 महिन्यांचा उच्चांक, दर 3.05 वरून 3.18 वर पोहोचला

132

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून गेल्या आठ महिन्यांत महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. महागाईचा दर 3.05 वरून 3.18 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने याबाबतची आकडेवारी जारी केली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला होता.

एसबीआयने आरटीजीएस, एनईएफटी व्यवहारांवरील शुल्क केले रद्द

एसबीआय अर्थात भारतीय स्टेट बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरील शुल्क रद्द करून टाकले आहे. रिझर्व्ह बँकेने यापूर्वी हे शुल्क रद्द केले होते. 1 जुलै 2019 पासून योनो ऍप, इंटरनेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंगद्वारे केलेलेल्या आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.

अन्नधान्याच्या किमती वाढल्या

अन्नधान्याच्या किमतीत 2.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात या किमती 1.83 टक्क्यांपर्यंत नियंत्रित होत्या. जून महिन्यात हा आकडा 1.31 टक्क्यांनी वाढला असून मे महिन्यात हा आकडा 1.24 टक्के इतका होता. जून महिन्यात भाजीपाल्यांच्या किमतीत 4.66 टक्क्याची वाढ झाली. मे महिन्यात ही वाढ 5.46 टक्क्यांपर्यंत होती. घरांच्या किमतीतही जूनमध्ये 4.84 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मे महिन्यात हा आकडा 4.82 टक्के इतका होता.

पहिल्या तीन महिन्यांत महागाई आटोक्यात

यंदाच्या वित्तीय वर्षात पहिल्या तीन महिन्यांत महागाई आटोक्यात होती. गेल्या महिन्यात आरबीआयने रेपो रेट दरात यंदा सलग तिसऱयांदा 0.25 टक्क्यांची घट झाली. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत घट होऊन ती 5.8 टक्के इतकी राहिली. गेल्या  पाच वर्षांतील ही सर्वात खालची पातळी आहे.

महागाईचा दर (टक्क्यांत)

श्रेणी         मे          जून

अन्नधान्य      1.83        2.17

मांस-मच्छि   8.12        9.1

डाळ            2.13        5.68

आपली प्रतिक्रिया द्या