‘ई-फायलिंग’ प्रणालीला पायाभूत सुविधांचा खोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दावा दाखल करण्यासाठी ई-फायलिंग प्रणालीचा वापर करण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र, संगणक, प्रिंटर, स्पॅनर, इंटरनेट असा पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे काही वकिलांना ऑनलाइन दावा दाखल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या, तरच ई-फायलिंग प्रणाली प्रभावीपणे अंमलात येईल, असे मत वकीलवर्गातून व्यक्त होत आहे.

न्यायालयांमधील कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. गेल्या काही वर्षांत काwटुंबिक न्यायालयांमध्ये पिंवा इतर फौजदारी खटल्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्रणालीचा वापर वाढला असून, त्या माध्यमातून वेळ आणि पैशांची बचत होण्यास मदत होत आहे. एकीकडे न्यायालयातील कामकाज अद्यावत होत असताना प्रकरण दाखल करण्यासाठी मात्र जुन्याच पद्धतीचा वापर केला जात होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दावा दाखल करण्यासाठी ई-फायलिंग प्रणालीचा वापर करण्याची सक्ती करण्याचा आदेश दिला होता.