
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या विरोधात मुझफ्फरपूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. नितीशकुमार एका कार्यक्रमाला जात असताना आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीकर शाईफेक केली. मुख्यमंत्र्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था असताना ही चूक कशी काय घडली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी जनक्रांती पार्टीचे प्रवक्ते उमाशंकर यादव आणि जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अंकित कुमार यांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.


























































