20 हजारांची लाच घेताना शिधावाटप निरीक्षक ट्रप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली येथील शिधावाटप दुकानातील व्यवस्थापकाला कारवाई होऊ द्यायची नसेल तर 20 हजार रुपये द्या अशी मागणी करून ती लाचेची रक्कम स्वीकारताना शिधा वाटप निरीक्षकाला ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सचिन आत्राम असे त्या अधिकाऱयाचे नाव आहे. कांदिवली येथे शिधा वाटप दुकान असून तेथे संतोष (नाव बदललेले) हे व्यवस्थापकाचे काम करतात. त्या दुकानात तांदूळ उतरवण्याकरिता ट्रक आला होता. तेव्हा आत्राम तेथे गेले व शिधा वाटप निरीक्षक नसताना सामान का उतरवले, तसेच गाडीचा जीपीएस बंद का ठेवला अशी विचारणा करत या प्रकरणी कारवाई होऊ द्यायची नसल्यास 20 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती.