ट्रोलरने ऐश्वर्याला विचारला अत्यंत घाणेरडा प्रश्न, अभिनेत्रीची पोलिसांकडे तक्रार

5126

बॉलीवूड कलाकारांसाठी हल्ली ट्रोलर्सची समस्या ही मोठी डोकेदुखी बनली आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर ट्रोलर्स या सेलिब्रिटींना ट्रोल करत असतात. काही ट्रोलर्स हे पातळी सोडून अश्लील टीकाही करायला लागले आहेत. अभिनेत्री ऐश्वर्यालाही याचा फटका बसला.

ऐश्वर्या सखुजा हिला इन्स्टाग्रामवर एकाने प्रश्न विचारला होता की b**b कसे वाढवायचे ? यामुळे प्रचंड संतापलेल्या ऐश्वर्याने त्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढला आणि मुंबई पोलिसांना टॅग करत हा प्रकार सगळ्यांसमोर मांडला. ऐश्वर्याने ही पोस्ट करत असताना मुंबई पोलिसांना प्रश्न विचारला आहे की ‘अशा लोकांचे काय करायचे?’

aishwarya-sakhuja

ऐश्वर्याने ही पोस्ट केल्यानंतर घाबरलेल्या ट्रोलरने तिला टॅग करून आणखी एक पोस्ट केली. यामध्ये त्याने त्याच्या आधीच्या पोस्टबद्दल माफी मागत पोलिसांना टॅग करून केलेली पोस्ट डिलीट करण्याची विनंती केली. ऐश्वर्याने त्या व्यक्तीची ही पोस्ट देखील इन्स्टाग्रामवर अपलोड केली असून तिने म्हटलंय की देवकृपेने याला पश्चाताप झाला. या व्यक्तीची पोस्ट आक्षेपार्ह ठरवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानते. अशा प्रकारची पोस्ट मला पहिल्यांदा आलेली नाहीये.

aishwarya-sakhuja-vegetable

ऐश्वर्याला या पूर्वीही असे अश्लील मेसेज मिळाले होते. यावेळी तिच्या संतापाचा अनावर झाल्याने तिने ही पोस्ट करायचं ठरवलं. अशा प्रकारचे मेसेज हे कोणालाही पाठवणं योग्य नसल्याचं तिने म्हटलं आहे.

Why is this ok?Im sure so many of you out there must be receiving such inappropriate messages all the time and all you…

Posted by Aishwarya Sakhuja Nag on Thursday, June 4, 2020

आपली प्रतिक्रिया द्या