
भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफच्या रकमेवर मिळणाऱया व्याजावरही आता कर लागू होणार आहे. ईपीएफ आणि व्हीपीएफमध्ये जर वर्षाला अडीच लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होत असेल तर त्यावर मिळणाऱया व्याजावर कर लागेल. नव्या तरतुदीनुसार, करपात्र व्याजाच्या गणनेसाठी प्रॉव्हिडंट फंड खात्यामध्येच एक स्वतंत्र खाते उघडले जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाच्या बजेटमध्ये यासंबंधी घोषणा केली होती.
























































