Provident Fund नोकरदारांना दिलासा,पीएफचा व्याजदर 8.65 टक्के झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सहा कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर 8.55 टक्क्यांवरून वाढवून 8.65 टक्के केला आहे. केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतच्या प्रस्तावाला आता अर्थमंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.