
पाठ्यपुस्तकांच्या छपाईच्या दर्जाबाबत उपस्थित झालेल्या तक्रारींची ‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’ने (NCERT) गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राधान्याने चौकशी सुरू असून, छपाईच्या त्रुटींसाठी दोषी आढळणाऱ्या मुद्रकांवर (प्रिंटर्स) कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा एनसीईआरटीने रविवारी दिला.
एनसीईआरटीने यासंदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “पाठ्यपुस्तकांच्या छपाईच्या दर्जाबाबतच्या तक्रारींची एनसीईआरटीने दखल घेतली असून, हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. त्याची प्राधान्याने तपासणी सुरू आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही मुद्रकावर कठोर कारवाई सुरू केली जाईल,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वच्छ, वाचनीय आणि विद्यार्थीस्नेही पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही एनसीईआरटीने नमूद केले आहे.
My son is in Class X, and after going through his NCERT textbook, I am deeply concerned about the quality of printing. The text is extremely small, blurred and poorly printed, making it difficult for students to read comfortably.
NCERT must understand that such poor-quality textbooks can cause unnecessary eye strain, headaches and other health concerns among schoolchildren.
Education should empower young minds, not compromise their health.
I urge @JoshiPralhad @EduMinOfIndia and @ncert to take immediate cognisance of this issue, review the printing standards and ensure that students receive clear, readable and student-friendly textbooks.
— Adv.Vineet Jindal Office (@VineetJindal_) November 22, 2026



























































