
1 सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे आरसी बुक हरवल्याची रीतसर तक्रार नोंदवा. त्याची तक्रारीची प्रत स्वतःजवळ जपून ठेवा.
2 जर तुमचे वाहन कर्जावर घेतलेले असेल, तर संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनीकडे अर्ज करून डुप्लिकेट आरसी काढण्यासाठी त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळवा.
3 आरटीओ कार्यालयातून किंवा परिवहन सेवा वेबसाइटवरून ‘फॉर्म 26’ डाऊनलोड करून त्यामध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक, चेसिस नंबर आणि वैयक्तिक माहिती भरा.
4 अर्जासोबत पोलीस तक्रारीची प्रत, वाहनाचा वैध विमा (इन्शुरन्स), पीयूसीचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा यांची आवश्यक कागदपत्रांच्या प्रत जोडा.
5 परिवहन वेबसाइटवर निर्धारित शुल्क ऑनलाइन भरल्यानंतर पावती आणि सर्व कागदपत्रांचा संच संबंधित आरटीओ कार्यालयात जमा करून नवीन आरसीची पोचपावती घ्या.


























































