इस्तंबूलमधील इस्रायली दूतावासाजवळ गोळीबारात 3 जणांचा मृत्यू; दोन पोलीस जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुर्कीमधील इस्तंबूल येथील बेसिक्तास भागात इस्रायली दूतावासाजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जण ठार झाल्याचे वृत्त आहे. दूतावासाला लक्ष्य करण्यात आले होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दूतावास गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. या घटनेत तीन जण ठार झाले असून दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत, अशी माहिती तुर्कीच्या मीडियाने दिली.

तुर्कीतील एनटीव्ही (NTV) आणि सीएनएन तुर्की (CNN Turkey) या वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गोळीबारात ठार झालेले तिघेही हल्लेखोर होते. तुर्कीच्या सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तिघे ठार केले.