बालीत रंगणार पहिली आंतरराष्ट्रीय योग स्पर्धा

सध्याचे युग धावपळीचे आहे. त्यामुळे स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी योगाभ्यासासारखा रामबाण उपाय नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत इंटरनॅशनल स्पोर्टस् ऍण्ड योगा फेडरेशनतर्फे पहिल्यांदा इंडोनेशियामधील बाली येथे 9 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 या स्पर्धेसाठी लंडन, अमेरिका, दुबई, सिंगापूर, मलेशिया इत्यादी देशांतून स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगेशदा यांना विश्वास आहे की, कित्येक गुणी स्पर्धकांना यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. स्वतः डॉ. मंगेशदा गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ योगशास्त्राचा प्रसार व प्रचार करीत आहेत. त्यांच्या योग संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे.

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या