युवासेनेच्या पदांकरिता मुलाखती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रामटेक, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभेतील युवासेनेच्या (युवक) पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.

रामटेक लोकसभा – शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 वेळ – सकाळी 11 वाजता. स्थळ – निसर्ग लॉन, न. प. हायस्कूल समोर, शासकीय विश्रामगृहाच्या मागे, कळमेश्वर
नागपूर लोकसभा – शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019, वेळ – दुपारी 4 वा. स्थळ – रविभवन, नागपूर
चंद्रपूर लोकसभा – शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 वेळ – सकाळी 11 वा. स्थळ – शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर शहर
गडचिरोली लोकसभा – रविवार, 3 फेब्रुवारी 2019 वेळ – सकाळी 11 वा. स्थळ – शासकीय विश्रामगृह, गडचिरोली शहर

इच्छुक उमेदवारांनी मुलाखती आधी एक तास अगोदर उपस्थित राहावे. तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.