व्यायाम मस्ट- प्रताप शेट्टी कबड्डी प्रशिक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिटनेस म्हणजे : शरीराला खेळासाठी लागणारा आवश्यक व्यायाम म्हणजे फिटनेस.

कबड्डी की आरोग्य : आरोग्य. कारण कबड्डी असो किंवा इतर खेळ त्यासाठी आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. आरोग्य उत्तम असेल तर चांगल्या अॅक्टिव्हिटी करू शकतो.

डाएट की जीवनशैली : डाएट. आजच्या काळात डाएट महत्त्वाचा आहे. कारण सध्या आपण जी काही फळं, भाज्या खातो त्यावर प्रक्रिया केलेल्या असतात. त्यामुळे आपण काय खावे आणि किती प्रमाणात खावे या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. त्यामुळे डाएट चांगला असेल तर जीवनशैली नक्कीच चांगली होईल.

सामान्य माणसासाठी फिटनेस : तरुणांनी फिटनेसकडे लक्ष द्यायलाच हवे, पण त्याचबरोबर पस्तिशीनंतरच्या लोकांनी फिटनेसकडे जास्त लक्ष द्यायला हवे. दिवसातला किमान अर्धातास फिटनेससाठी देणं गरजेचे आहे.

व्यायाम कसा करावा? : मी जुन्या पद्धतीच्या व्यायामप्रकाराला जास्त महत्त्व देईन. त्यामध्ये सूर्यनमस्कार, बैठका, चालणे, धावणे या पद्धतीचा व्यायाम करायला हवा.

व्यायाम आणि डाएट समतोल कसा राखता? : ज्या पद्धतीने आपण व्यायाम करतो त्याच पद्धतीने डाएट करायला हवा. व्यायाम करून पोटभर खात बसलात तर त्या व्यायामाला काही अर्थ नाही. व्यायाम केल्यावर त्याच पद्धतीने डाएट करण्याची गरज आहे. व्यायाम करून भरपूर भूक लागत असेल तर शरीराला आवश्यक असेच पदार्थ खा. जंकफूड खाऊ नका.

कबड्डी म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा : स्पर्धा. कबड्डी हा असा खेळ आहे ज्यामध्ये `दमाला’ फार महत्त्व आहे. जेव्हा कबड्डी कबड्डी असा स्टार्ट घेतो तो एक योगामधील प्राणायामाचा प्रकार आहे. यामुळे शरीराची रक्ताभिसरणाची प्रक्रिया जलद गतीने होत असते. त्यातून आरोग्य उत्तम राहते आणि ते उत्तम असल्यास आपल्या खेळातून दिसणं येतंच.

दिवसातून पाणी किती प्यावे : दिवसातून कमीत कमी तासाभराने एक-एक ग्लास कोमट पाणी प्यायला हवे. शरीराला त्याचा फायदा होतो. आजारपण येत नाही.

व्यायामाला किती वेळ देता? : सकाळी दोन तास धावणे आणि जिममध्ये व्यायाम असा वेळ देतो. पण त्याचबरोबर आजच्या काळात योगा फार महत्त्वाचा आहे.

जिमला जायला न मिळाल्यास…? : रविवारी जिमला जात नाही. अशावेळी वॉकिंगला वेळ देतो.

बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? : बाहेर गेल्यावर अडचण होते. तेव्हा आम्हाला पर्याय नसतो. अशावेळी डाएट बॅग नेतो, त्याचबरोबर मसालेदार, तेलकट खाणे टाळतो.

कोणता पदार्थ नियमित खाता? : फळं, अंडी, चिकन.

फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलाय? : गोड पदार्थांचा त्याग केला आहे. त्यात चहा पूर्णपणे बंद केला आहे.
फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? : नियमित व्यायाम करतो.

फिटनेस मंत्र : योग, सूर्यनमस्कार, मेडिटेशन, बैठका या हिंदुस्थानी पद्धतीच्या व्यायाम प्रकारांवर भर द्या. चाळिशीनंतर चाला, चाळिशीखाली असाल तर जॉगिंग करण्याकडे लक्ष द्या आणि खाण्यावर नियंत्रण ठेवा.