सैनिक हो तुमच्यासाठी

457

>> संजीवनी धुरी-जाधव

आपल्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणारा… वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा… ज्याच्यामुळे आपण सुखाची झोप घेत आहोत.. अशा वीर जवानांच्या आयुष्यात दोन घटका करमणुकीच्या आणण्यासाठी एक अवलिया गेली अनेक वर्षे खारीचा वाटा घेतोय…

संतोष परब. गेली अनेक वर्षे युद्धभूमीवर विनामूल्य करमणुकीचे कार्यक्रम सादर करत आहेत. सफर सम्राट दाजा पाटील माझ्या संपर्कात आले. त्यांनी ही विनामूल्य सैनिक करमणूक संकल्पना डोक्यात आणली. त्याच्यानंतर आम्ही 2002 मध्ये जम्मू-कश्मीरमध्ये अतिशय संवेदनशील असलेल्या उरी भागात तीस हजार सैनिक तैनात असतात त्या भागात मला जाऊन कार्यक्रम करण्याचा योग मिळाला. त्यानंतर जम्मू-कश्मीरला पाच कार्यक्रम केले त्यावेळेला. त्यानंतर 2002 पासून एक वेड लागले. अशा पद्धतीने सैनिकांसाठी आपण कार्यक्रम का करू नये, तेव्हापासून आपण त्या पद्धतीने करत आलो. हे झाले इंडियन मिलिटरीचे कार्यक्रम. त्यानंतर आम्ही बीएसएफकडे गेलो. (Border Security Force) ही एक प्रकारची मिलिटरी आहे.

हिंदुस्थानी सीमांचे रक्षण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स करते. हे तिथे गेल्यावर मला कळले. जेव्हा परकीय आक्रमण होते तेव्हा पहिल्यांदा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तिथे फाईट करते आणि जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेला हिंदुस्थानी सेना त्याच्यामध्ये सहभागी होते.

2015 सालामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला 100 वर्षें पूर्ण झाली. तेव्हा आम्ही हा कार्यक्रम संस्कृती मंत्रालय, हिंदुस्थान सरकारकडून केला. त्याच्यानंतर एक डोक्यात आले की, ज्यांच्यामुळे आधीपासून हा कार्यक्रम करतो. आपण हे का सातत्याने करतो. मग लक्षात आले की ज्यांच्यामुळे आपण घरी शांततेत झोपू शकतो त्या सैनिकांचे आपण काहीतरी देणे लागतो. मग सातत्याने आम्ही हे कार्यक्रम करतोय. त्याची प्रेरणा राजा पाटील यांच्याकडून मिळाली.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ नावाचा कार्यक्रम 1987 च्या सुमारास मुंबईत आला होता. हा कार्यक्रम आल्यानंतर अमेरिकेतील मंडळी मुंबईत येऊन लावणी सादर करायची. मुंबईतील लोकांनी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद दिला. कार्यक्रम हाऊसफुल असायचा. ही मंडळी डिसेंबर जानेवारीपुरती मुंबईत यायची आणि प्रयोग करून पुन्हा निघून जायची. त्यावेळी हे मोहन वाघांनी केले होते. त्याच्यानंतर मी मनात आणले मुंबईत अशा प्रकारचा लावणीचा तीन तासांचा प्रयोग का करू नये? मग 1997 ला मुंबईत पहिल्यांदा लावणीचा तीन तासांचा प्रयोग लावण्यवेलच्या रूपाने मी रंगमंचावर आणला. त्यावेळेला लावणीचे कार्यक्रम होत नव्हते. ऑर्केस्ट्रा होत होते, पण लावणी बेस असलेले कार्यक्रम होत नव्हते. त्यावेळेला प्रयोग करत असताना अचानक डोक्यात आले की या लावणी प्रयोगाचे अलग सहा प्रयोग का करू नये? त्यावेळेला राजा पाटील मला भेटले आणि त्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये विनामूल्य सैनिक करमणूक संकल्पना अमलात आणली ती आतापर्यंत चालवली.

सैनिकांचे आयुष्य फार खडतर असते. सकाळी ठरलेल्या वेळेत उठायचे आहे, ठरलेल्या वेळेत नाश्ता करायचा, सीमारेषेवर गस्त घालायची सतत. सततच्या गोष्टींना ते कंटाळले असतात. कारण तीसुद्धा माणसं आहेत. त्यांचेसुद्धा कुटुंब आहे. कुटुंबसुद्धा लांब ठेवून देशांच्या सीमारेषांवरती 24-24 तास हाडे गोठवणाऱया थंडीत जास्तीत जास्त गरम तापमानामध्ये सीमांचे रक्षण करतात. त्यांना तिथे कुठलीही करमणूक नसते, तिथे नेटवर्क नसते. त्यामुळे मोबाईल चालत नसतो. त्यामुळे तिथे लाइव्ह करमणूक वादक, गायक, नर्तिका, साऊंड, लाइट सगळं मुंबईतून घेऊन जायचं आणि त्यांच्या करमणुकीसाठी कार्यक्रम करायचा अशा पद्धतीने कार्यक्रम सादर करतो. आपण त्यांचे काहीतरी देणे लागतो. सैनिकहो तुमच्यासाठी हे केवळ गीत न बोलता प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काम आम्ही गेली अनेक वर्षे करतोय. जम्मू-काश्मीर उणे थंडीत आणि राजस्थानात दिवसा अंदाजे 47 अंश डिग्री सेल्सियस आणि रात्री अंदाजे 11 अंश डिग्री सेल्सियस इतक्या विरोधी तापमानात हिंदुस्थानी जवान सीमेवर देशाच्या समीमांचे रक्षण करतात आणि कलावंत त्याच वातावरणात जाऊन आम्ही त्यांची विनामूल्य करमणूक करत असतो.

आम्ही जेव्हा पहिल्यांदा सैनिकांसाठी कार्यक्रम करायला गेलो होतो तेव्हा आम्ही देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. तेव्हा तिकडे लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर होते. तिकडे त्यावेळेला त्यांचा मला निरोप आला की, ही गाणी आम्ही वर्षाच्या 365 दिवस ऐकतो तीच गाणी ऐकवून तेच आयुष्य जगवता. आमची करमणूक करण्यासाठी येता तेव्हा तुम्हाला मोकळीक दिलेली असते सादरीकरणाची. त्यामुळे आमची करमणूक होईल,अशी गाणी सादर करा. त्याच्यानंतर लावणीचे कार्यक्रम केले. तिथे अमराठी सैनिक आहेत तेही लावणीवर तितकेच प्रेम करतात. त्यानंतर त्यात हिंदी गाणी घेतली. नंतर असं दिसायला लागलं अरे, या लोकांना खरोखरच विरंगुळ्याचा क्षण नंतरच्या कामासाठी उत्साह देऊन जातो.

सलामी संगीतमय
यावर्षीचे वेळापत्रक ठरलेले आहे. आम्ही 24 जानेवारीला मुंबईहून निघणार आहोत. 26 जानेवारीला पहिला कार्यक्रम जोधपूरला मुख्यालयात असतो. दुसरा कार्यक्रम अणुस्फोट, अणुचाचणी झाली त्या पोखरणला. तिसरा कार्यक्रम जेसलमेर, रामनगर, बारमेर, दांतीवाडा, मेसाना, गांधीनगर या सगळय़ा बॉर्डरवर कार्यक्रम सादर करणार आहोत. 24 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक असते ‘सलामी’ एक नृत्यमय संगीतमय सलामा सीमा सुरक्षा बलाकरिता.आपला हात जेव्हा विश्वासाचा असतो तेव्हा हजारो हात मदतीसाठी तयार असतात याचा मला अनुभव आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या