युवासेनेच्या विस्तारक पदांकरिता रविवारी मुलाखती

युवासेना विस्तारक पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सदर पदांकरिता रविवार, 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत शिवसेना भवन, दादर येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

 सदर पदांकरिता पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवासेनेचा सक्रीय सदस्य असणे आवश्यक असून उमेदवाराची वयोमर्यादा 35 वर्षे आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखती पूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे तसेच येताना आपले पासपोर्ट साईज छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक  पदाधिकाऱयांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील. विस्तारक या पदाकरिता युवासेनेतील मुंबई विभागातील विधानसभापर्यंत तसेच जिह्यातील तालुका युवा अधिकारी पदापर्यंत असणारे सर्व पदाधिकारी मुलाखत देऊ शकतील. विस्तारक पदासाठी इच्छुक युवक युवासेनेत / संघटनेत किमान पाच वर्षे सक्रिय असणे आवश्यक आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.