फारुख अब्दुल्लांच्या घरात घुसखोरी करणाऱ्याला ठार मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या भटिंडी येथील घरात एक भरधाव कार घुसल्याने खळबळ माजली होती. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात त्या गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला आहे. हा चालक अब्दुल्ला यांच्या घरात घुसण्यासाठी आला होता असे बोलले जात आहे. मशरुप अहमद असे त्या घुसखोराचे नाव असून तो पूँछ जिल्ह्याचा रहिवासी होता.

शनिवारी सकाळी अब्दुल्ला यांच्या घराबाहेर सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेट्स उडवून एक भरधाव कार त्यांच्या घराच्या परिसरात घुसली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अब्दुल्ला यांच्या घरात घुसायचा प्रयत्न करत होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर गोळीबार करावा लागलाय. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक गुप्ता यांनी दिली आहे.

फारुख अब्दुल्ला पुन्हा बरळले, कश्मीरप्रश्नी पाकड्या आफ्रिदीला दिली साथ

काही वेळासाठी मशरुप हा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आल्याची देखील चर्चा रंगली होती. मात्र पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

SUMMARY : Intruder shot dead outside residence of former CM Farooq Abdullah