ग्रेटर बँकेच्या कारवाईची चौकशी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जाची परतफेड करूनही दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँकेकडून बेकायदेशीर वसुली सुरू असल्याचा आरोप आर. एच. फूड्सचे संचालक दिनेश जोशी यांनी केला आहे. वसुलीसाठी माझे कुटुंब आणि नातेवाईकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू असल्याचे जोशी यांनी सांगितले. माझ्यावर होत असलेल्या कायदेशीर कारवाईची न्यायालयीन चौकशीची मागणीही त्यांनी केली. 2011 मध्ये व्यवसायानिमित्त जोशी यांनी दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँकेतून कर्ज घेतले. 1 कोटी रुपये कॅश क्रेडिट, 20 लाख रुपये गृहकर्ज आणि 2016 मध्ये 35 लाख रुपयांचे तारण कर्ज घेतले. 2017 पर्यंत त्यांनी बँकेचे हप्ते नियमित भरले, मात्र त्यानंतर कर्ज थकल्याने बँक मानसिक त्रास देत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे.