मोबाईल चाहत्यांसाठी पर्वणी, आयफोनचे तीन हॅण्डसेट एकाचवेळी बाजारात

457

मोबाईल हॅण्डसेटच्या विश्वात अग्रेसर असलेल्या ऍपल या कंपनीने तीन नवीन आयफोन्स एकाचवेळी बाजारात आणले. येथील कपर्टिनो येथे असलेल्या ऍपल कंपनीच्या मुख्यालयात आयफोन-11, आयफोन-11-प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स हे तीन हॅण्डसेट एका मोठय़ा सोहळ्यात लाँच करण्यात आले.

20 सप्टेंबरपासून या हॅण्डसेटची पूर्वनोंदणी सुरू असून आधी नोंदणी केल्यास 10 हजारांपर्यंत कॅशबॅकची सुविधा देण्यात आली आहे. या तीनही आयफोन्सची वैशिष्टय़े वेगवेगळी आहेत. आयफोन-11मध्ये आयफोन एक्सआर मॅक्सपेक्षा 5 तास जास्त बॅटरी चालणार आहे. या मोबाईलसोबत 18 व्हॉट्सचा फास्ट चार्जर मिळेल.

दुसरीकडे आयफोन-11-प्रोमध्ये 12 मेगापिक्सलचे 3 कॅमेरे देण्यात आले आहेत. यात एक वाइड अँगल, दुसरा टेलीफोटो लेन्स आणि तिसरा कॅमेरा अल्ट्रा वाईड असणार आहे. आयफोन-11-प्रो मॅक्स मोबाईलमध्ये साडेसहा इंचाचा डिस्प्ले आहे, तर आयफोन-11-प्रोमध्ये 5.8 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन-11-प्लस दोन प्रकारांत मिळेल. यात सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या