
आयफोन 17 सीरिजला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. नवीन सीरिज लाँचिंग होण्याआधीच आयफोन 16 वर सूट मिळत आहे. आयफोन 16 च्या 128 जीबी स्टोरेजच्या फोनला 79 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन 12 टक्के डिस्काऊंटसोबत 69,999 रुपयांना मिळत आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयसोबत खरेदी केल्यास 3 हजार रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक आणि डिस्काऊंटनंतर हा फोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकते.