आयफोनला बसतोय मालवेयरचा धोका, 12.8 कोटी युजर्सला फटका

फोटो प्रातिनिधीक

सुमारे 12.8 कोटी आयओएस युजर्स XcodeGhost नावाच्या धोकादायक मालवेयरमुळे प्रभावित झाले आहेत. हे मालवेयर 2015मध्ये सर्वप्रथम निदर्शनास आले. अॅप स्टोअरवर अपलोड केलेल्या आयफोन आणि आयपॅडच्या बऱयाच अॅप्सवर त्याचा परिणाम झाला आहे.

एपिक गेम्स आणि अॅपलवर सुरू असलेल्या चाचणीदरम्यान असे दिसून आले की, 12. 8 कोटी युजर्सने दोन हजार 500 असे अॅप्स डाऊनलोड केले आहेत, ज्यांच्यावर मालवेयरचा प्रभाव आहे. त्यापैकी एक कोटी 18 लाख युजर्स अमेरिकेत आहेत. वुईचॅट, नेटईज यासारख्या लोकप्रिय 50 अॅप्समध्ये मालवेयर असल्याचे दिसून आले आहे. ते या बनावट कॉपीमुळे आले आहेत. अॅपलने तत्काळ युजर्सला सावध करण्याचे काम सुरू केले. अॅपलने अशा 25 अॅप्सची यादी प्रकाशित केली आहे ज्यामध्ये XcodeGhostने शिरकाव केला आहे.

म्हणजे काय

मालवेयर हे एक असे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आहे जे आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरसाठी घातक ठरू शकते. अशा प्रकारचे सॉफ्टवेयर हॅकर्स आपला वैयक्तिक डेटा चोरी करण्यासाठी वापरतात. आपण इंटरनेट सर्फींग करत असताना बिनधास्तपणे गाणे, व्हिडियो आदी डाऊनलोड करतो. त्यासोबत मालवेयर आपल्या डिव्हाईसमध्ये डाऊनलोड होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या