
जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग. 2008 सालापासून ही स्पर्धा सुरू झाली. जगभरातील आघाडीच्या क्रिकेटपटूंना चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी ही लीग चांगला प्लॅटफॉर्म आहे. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून अनेक विक्रम नोंदवण्यात आले. यातील काही विक्रम जवळपास तोडणे अशक्य आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे विक्रम…
1. एका सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा खेळाडू क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरूद्ध ६६ चेंडूत नाबाद 175 धावा केल्या होत्या.
2. एका सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावावर आहे. या संघाने 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध 20 षटकांमध्ये 5 बाद 265 धावा चोपल्या होत्या.
3. एका सामन्यात सर्वाधिक कमी धावसंख्या करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्याच नावावर आहे. 2017 मध्ये आरसीबीचा संघ अवघ्या 49 धावांमध्ये गारद झाला होता.
4. सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. केकेआरने 2014 साली सलग 9 सामने जिंकले होते.
5. आयपीएल सामन्यात पदापर्णात 6 बळी घेण्याचा विक्रम अल्जारी जोसेफच्या नावावर आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना सनरायजर्स हैद्राबाद विरूद्ध ही कामगिरी नोंदवली होती.
6. एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरूद्ध 17 षटकार मारले होते.
7. जलद शतक झळकावण्याचा विक्रम देखील क्रिस गेलच्याच नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध खेळताना अवघ्या 30 चेंडूत शतक झळकावले होते.
8. जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम पंजाबचा कप्तान के. एल राहुलच्या नावावर आहे. 2018 मध्ये दिल्लीविरुद्ध त्याने 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.
9. आयपीएलमध्ये सर्वाधिक ३ वेळा हॅट्रीक घेण्याचा विक्रम अमित मिश्राच्या नावावर आहे. त्याने तीन वेळा हा कारनामा केलेला आहे.
10. आयपीएलच्या एका सिजनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रनमशिन विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 2016 साली 973 धावा केल्या होत्या.
11. आयपीएलच्या एका सिजनमध्ये सर्धाधिक शतके झळकावण्याचा विक्रम देखील किंग कोहलीच्याच नावावर आहे. त्याने 2016 साली तब्बल 4 शतकं ठोकली आहेत.
12. आयपीएलच्या एका सिजनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2012 साली तब्बल 59 षटकार मारले होते. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील गेलच्याच नावावर असून त्याने आतापर्यत 349 षटकार मारले आहेत.
13. आयपीएलच्या सलग सात सिजनमध्ये 400 हून अधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर आहे. त्याने सलग 7 वर्ष 400 हून अधिक धावा केल्या आहेत.
14. कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाची कप्तानी करताना तब्बल 115 सामने जिंकले आहेत.
15. आयपीएलमध्ये सर्वात मोठी भागिदारी विराट आणि एबी.डी. व्हिलीयर्सच्या नावावर आहे. त्यांनी गुजरात लॉयन्स विरूद्ध खेळताना 229 धावांची भागिदारी केली होती.





























































