IPL 2020 – स्टोक्सचे अर्धशतक, राजस्थानचा पंजाबवर 7 विकेट्सने ‘रॉयल’ विजय

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 7 विकेट्सने पराभव केला. पंजाबने दिलेले 186 धावांचे आव्हान राजस्थानच्या संघाने 3 विकेट्स गमावून 17.3 षटकात पूर्ण केले.

राजस्थानकडून बेन स्टोक्स याने 50 धावांची अर्धशतकीय खेळी केली, तर रॉबिन उथप्पाने 30 धावांचे योगदान दिले. संजू सॅमसनने 48, स्मिथने नाबाद 31 आणि जोस बटलर याने 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबकडून अश्विन आणि जॉर्डनने प्रत्येकी 1 बळी घेतला.

गेलची विक्रमी खेळी

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित 20 षटकात 4 बाद 185 धावा केल्या. ख्रिस गेल याने सर्वाधिक 99 धावा केल्या. शतकापसून 1 धाव दूर असताना आर्चरने त्या क्लिन बोल्ड केले.

गेलने 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 63 चेंडूत ही खेळी साकारली. यादरम्यान त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला.

IPL 2020 – ‘युनिव्हर्सल बॉस’ची जादुई कामगिरी, टी-20 मध्ये 1000 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम

ख्रिस गेल याच्यासह स्पर्धेत फॉर्मात असणाऱ्या कर्णधार के. एल. राहुल याने 46, निकोलस पूरन याने 22 धावांची खेळी केली. राजस्थानच्या आर्चरने आणि स्टोक्समे प्रत्येकी 2 बळी घेतले.

दरम्यान, या पराभवामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचे आयपीएल 2020 मधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या