IPL 2020 – चेन्नईचा सांघिक खेळ, हैद्राबादवर 20 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघाने सनरायझर्स हैद्राबाद संघाचा 20 धावांनी पराभव केला. यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईचा हा तिसरा विजय आहे. विजयासाठी दिलेले 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैद्राबादचा संघ 20 षटकात 8 बाद 147 धावाच करू शकला.

चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 167 धावा केल्या. शेन वॉटसन याने 42, रायडूने 41, धोनीने 23 आणि जडेजा याने 25 धावांचे योगदान दिले. सलामीला आलेल्या सॅम कुरम याने 31 धावा केल्या. प्रत्युत्तरा दाखल खेळताना हैद्राबाद कदम एकट्या लेन विलीयम्सन याने 57 धावांची खेळी केली. इतर खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेल्याने हैद्राबादला पराभव स्वीकारावा लागला.

चेन्नई कडून करण शर्मा, ब्राव्हो याने प्रत्येकी 2 बळी घेतले. याशिवाय सॅम कुरम, आर. जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येक 1 बळी घेतला. चेन्नईचा 8 लढतीत हा तिसरा विजय आहे.