आयपीएलमधील धडाकेबाज फलंदाजाचा साखरपुडा, या क्रिकेटपटूंनी लावली हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलमध्ये सहा चेंडूत पाच षटकार ठोकणारा धडाकेबाज फलंदाज राहुल तेवातिया याचा त्याची गर्लफ्रेंड रिद्धी पन्नूसोबत साखरपुडा पार पडला आहे. तेवातिया हा राजस्थान रॉयल्सचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू आहे. तेवातियाने सोशल मीडियावर त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. राहुलच्या या कार्यक्रमाला त्याचे सह खेळाडू नितीश राणा व जयंत यादव उपस्थित होते.

राहुल तेवातिया हा युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत क्षणार्धात त्याने गेम चेंज करत राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला होता. त्या विजयानंतर तेवातिया जबरदस्त प्रसिद्ध झाला होता. 2014 पासून तेवातिया आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत तो तीन संघांसाठी खेळला आहे.