IPL 2020 – संदीप शर्माचा पराक्रम, सर्वाधिक वेळा केली ‘रनमशीन’ विराटची शिकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैद्राबाद संघात सामना रंगला. हैद्राबाद संघाने हा सामना 5 विकेट्सने आपल्या नावे केला. हैद्राबादच्या विजयात वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने मोठे योगदान दिले.

संदीपने धारधार गोलंदाजी करत बंगळुरूचे 2 गडी बाद केले. यातील एक बळी बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याचा होता. संदीप शर्मा याच्या गोलंदाजीवर बाद होताच विराटने एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत सर्वाधिक वेळा विराटला बाद करण्याचा विक्रम संदीप शर्मा याने केला आहे. त्याने विराटला 7 वेळा बाद केले आहे. दुसरीकडे ‘रनमशीन’ विराट कोहली यांच्यासाठी देखील हा नकोस विक्रम आहे.

दरम्यान, संदीप शर्मा याच्या व्यतिरिक्त टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने विराटला 6 वेळा बाद केले आहे. नेहराचा हा विक्रम संदीप शर्मा याने तोडला आहे.

आयपीएलमध्ये संदीप शर्मा समोर विराट चाचपडताना दिसला आहे. 12 डावात त्याला संदीप शर्मा विरुद्ध फक्त 68 धावा काढता आल्या असून 7 वेळा तो बाद झाला आहे.