
मराठी भाषिकांसाठी ‘शेयरचॅट’ हे सोशल मीडिया व्यासपीठ गुड न्यूज घेऊन आले आहे. याअंतर्गत आता यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलचा अनुभव मराठी भाषेत घेता येत आहे.
‘शेयरचॅट’ या अॅपवर आठ विभिन्न भाषांमध्ये आयपीएलमधील लढतींचा धावफलक पाहायला मिळत आहे. मराठीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी, बांगला, पंजाबी, मल्याळम या भाषांमध्ये आयपीएलमधील माहिती या अॅपवर सहज उपलब्ध होत आहे.
फॅनसोबत चॅट
आयपीएलमध्ये वीरेंद्र सेहवाग, अजित आगरकर, गौतम गंभीर, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, आकाश चोप्रा हे क्रिकेटपटू समालोचनाची भूमिका पार पाडत आहेत. ‘शेयरचॅट’वर दररोज एक समालोचक लकी ड्रॉमध्ये विजयी ठरलेल्या फॅनसोबत चॅट करीत आहे. अजित आगरकर मराठी भाषिक फॅनसोबत चॅट करताना दिसणार आहे.





























































