
आयपीएलच्या 18 व्या हंगामाच्या फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला समारोप सोहळा देशभक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यात प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी हिंदुस्थानच्या सशस्त्र दलांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित हा कार्यक्रम पुलवामा येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हिंदुस्थानी लष्कराने केलेल्या निर्णायक कारवाईला समर्पित होता. या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकलीच, शिवाय देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रति कृतज्ञता आणि आदरही व्यक्त करण्यात आला.
संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या समारोप सोहळ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी आपल्या सिद्धार्थ आणि शिवम महादेवन या मुलांसह एक संस्मरणीय सादरीकरण सादर केले. त्यांनी ‘ऐ वतन’, ‘लहरा दो’, ‘मां तुझे सलाम’, ‘पंधों से मिलते हैं पंधे’ आणि ‘वंदे मातरम्’ यांसारखी देशभक्तिपर गीते सादर केली.