आयपीएलच्या अंतिम सामन्याची तारीख ठरली

513

जगभरात उदंड प्रतिसाद लाभलेल्या आयपीएलच्या आगामी मोसमात मोठे बदल करण्यात आले आहेत. 29 मार्च रोजी मुंबईत या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार असून या स्पर्धेचा जेता 24 मे रोजी ठरणार आहे. तसेच रात्रीच्या लढती आता आठऐवजी साडे सात वाजता सुरू होतील. शिवाय शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये प्रत्येकी दोन लढतींसह चार लढती खेळवण्यात येत होत्या. या वर्षी मात्र दिवसाला एकच लढत खेळवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सूत्रांकडून याबाबत माहिती देण्यात आली.

45 ऐवजी 57 दिवसांची स्पर्धा

29 मार्च ते 24 मे या कालावधीत आयपीएलचा यंदाचा मोसम पार पडणार आहे. दरवर्षी 45 दिवसांमध्ये ही स्पर्धा आटोपते. यंदा मात्र 57 दिवसांचा कालावधी या स्पर्धेसाठी असणार आहे. त्यामुळे वीकेण्ड अर्थातच शनिवार व रविवारी दोन ऐवजी एकच लढत आयोजित करण्यात येणार आहे.

आयपीएलच्या लढती रात्री आठ वाजता सुरू होत असल्यामुळे निकाल लागेपर्यंत रात्री 12 ही वाजायचे. त्यामुळे टेलीव्हीजनवरून लढत पाहणाऱयांच्या संख्येत घट झाली. टीआरपी घसरली. त्यामुळे आठऐवजी आता साडे सात वाजता लढत सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप ठरवण्यात आलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या