आयपीएलमध्ये नाडा व यूएई संयुक्तपणे खेळाडूंची डोप टेस्ट करणार

190

आयपीएल ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा नसली तरी हिंदुस्थानातील मोठी टी-20 लीग म्हणून या स्पर्धेकडे बघितले जाते. त्यामुळे नॅशनल ऍण्टी डोपिंग एजन्सी (नाडा) आणि यूएईतील नॅशनल ऍण्टी डोपिंग कमिटी (नाडो) यांच्याकडून संयुक्तपणे आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया संघांतील क्रिकेटपटूंची डोप टेस्ट करण्यात येणार आहे. खेळाडूंचे युरिन सॅम्पल घेण्यासाठी दोन्ही संस्थांकडून ‘डीसीओ’ची निवड करण्यात येणार आहे. हॉटेल किंवा रिसॉर्ट यांच्यापैकी एका ठिकाणी खेळाडूंच्या मर्जीनुसार हे सॅम्पल घेण्यात येणार आहे. यावेळी खेळाडूंसोबत फक्त संस्थेकडून नियुक्त करण्यात आलेला ‘डीसीओ’ असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या