आयपीएस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षकाचे नाव

1200


सामना ऑनलाइन। मुंबई

फरीदाबादमधील आयपीएस अधिकारी आणि एनआयटीचे उपायुक्त विक्रम कपूर यांनी मंगळवारी रात्री आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विक्रम कपूर हे खूप अस्वस्थ होते, त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ते कशामुळे आणि का अस्वस्थ होते, हे अद्याप समजलेले नाही.

उपायुक्तांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण पोलीस विभागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरा डीसीपींच्या मृत्यूची बातमी समजताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवून या संबंधी तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान पोलिसांना चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये पोलीस निरीक्षक आणि अन्य व्यक्तींच्या नावाची नोंद आढळली आहे. त्यामुळे या आत्महत्येमागे पोलीस दलातील वाद आहे का संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या