जबरदस्त! 8 GB रॅमचा दमदार स्मार्टफोन लॉन्च, किंमतही खिशाला परवडणारी; जाणून घ्या…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हीओचा सब-ब्रँड असणाऱ्या iQOO ने गेल्या वर्षी हिंदुस्थानमध्ये आपला पहिला स्मार्टफोन iQOO 3 लॉन्च केला होता. आता या कंपनीने घरच्या बाजारात एक दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. iQOO U3 असे या नव्या स्मार्टफोनचे नाव असून यात 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच अनेक अपडेट फीचर्स देण्यात आले आहेत.

iQOO U3 हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज अशा 2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तसेच काळ्या आणि निळ्या रंगात हा फोन उपलब्ध असून 17 डिसेंबर 0असून याची विक्री सुरू होणार आहे.

images-5

किंमत

– 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1498 युआन (जवळपास 16,800 रुपये) आहे.

– 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 1698 युआन (जवळपास 19,000 रुपये) आहे.

iqoo-u3

वैशिष्ट्य

– 6.58 इंचाचा आईपीएस एलसीडी स्क्रीन

– डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 20.07:9 आणि रेजॉलूशन 1080×2408 पिक्सल आहे.

– फिंगरप्रिंट स्कॅनर

– ड्युल कॅमेरा सेटअप, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर

– 5000mAh ची मजबूत बॅटरी

– लिक्विड कूलिंग टेक्नॉलजी, ड्यूल सिम सपॉर्ट, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी, फेस अनलॉक सारखे फीचर्स फोनमध्ये देण्यात आले आहेत.