Iran Israel War – इंटरनेट ठप्प होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातातील युद्धामुळे चर्चेत असलेली होर्मुझची सामुद्रधुनी ही केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर डिजिटल पायाभूत सुविधांसाठी व डेटा वहनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. या सागरी मार्गाच्या तळाशी इंटरनेट डेटाचे वहन करणाऱ्या फायबर-ऑप्टिक केबल्सचे प्रचंड मोठे जाळे आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास हिंदुस्थानसह अनेक देशांतील इंटरनेट ठप्प होऊ शकते.

हिंदुस्थानी इंटरनेटसाठी होर्मुझ का महत्त्वाची?

इंटरनेट केवळ उपग्रहांद्वारे चालते असा समज आहे. तो चुकीचा नसला तरी जगातील बहुतांश इंटरनेटचे वहन समुद्राखालील फायबर-ऑप्टिक केबल्सद्वारे होते. हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्याने अरबी समुद्रातून आखाती प्रदेश आणि युरोपला जाणाऱ्या केबल्सवर अवलंबून आहे. या केबल्सचा मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो. हिंदुस्थानातून पश्चिमेकडे जाणाऱ्या इंटरनेट ट्रफिकपैकी सुमारे एक तृतीयांश या क्षेत्रातून जाते. हा डेटा ट्रफिक आपल्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतो.

कशावर होऊ शकतो परिणाम?

ई-मेल

ऑनलाइन बँकिंग

सोशल मीडिया

व्हिडीओ कॉल

स्ट्रीमिंग सेवा

क्लाउड कम्प्युटिंग

डिजिटल ऑपरेशन्स

g होर्मुझ सामुद्रधुनीच्या तळातील इंटरनेट केबलचे जाळे विस्तारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळेच धोका वाढत आहे, अशी भीती लाइटस्टॉर्मचे प्रमुख अमजीत गुप्ता यांनी व्यक्त केली.