Iran US Israel War – इराणचा अमेरिकेवर पलटवार; एफ-15 लढाऊ विमान हार्मुझजवळ पाडलं, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण, इस्रायल आणि अमेरिकेत गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध आता धोकादायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हार्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर आखातातील तणाव आणखी वाढला आहे. ट्रम्प यांच्या या अल्टिमेटमनंतर इराणने अमेरिकन लष्कराचे एफ-15 हे लढाऊ विमान हार्मुझजवळ पाडले. इराणच्या माध्यमांनी हा दावा केला असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

इराणच्या दक्षिण किनारपट्टीवरील हार्मुझ बेटाजवळ इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमने अमेरिकेचे एफ-15 हे लढाऊ विमान रोखले आणि पाडले. ‘तेहरान टाइम्स’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 29 सेकंदांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये इराणी सैन्याने एफ-15 विमानाचा शोध घेऊन ते कसे पाडले, हे दाखवण्यात आले आहे. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. हे विमान अमेरिकेचे आहे की इस्रायली संरक्षण दलाचे याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच इराणच्या दाव्यानंतर अमेरिका-इस्रायल या दोन्ही देशांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, याआधी यापूर्वी इराणने अमेरिकेचे अत्यंत प्रगत एफ-35 हे पाचव्या पिढीतील स्टेल्थ विमान पाडल्याचा दावा केला होता. एका मोहिमेवर असताना विमानाचे नुकसान झाले असून वैमानिक सुरक्षित आहे, अशी माहिती यानंतर अमेरिकेने दिली होती. मात्र इराणच्या हल्ल्यात हे विमानाचे नुकसान झाल्याचे अमेरिकेने म्हटले नव्हते. तसेच मध्य पूर्वेतील संघर्षात आतापर्यंत चार F-15 विमाने पाडण्यात आली आहेत. याच महिन्याच्या सुरुवातीला कुवैतच्या सैन्याने चुकून अमेरिकेचीतीन F-15E स्ट्राईक ईगल विमाने पाडली होती.

Israel Iran War – युद्ध लांबल्यास जगभरात लॉक डाऊनची परिस्थिती; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा