आखातात पुन्हा युद्धाचे ढग ,इराणचा अमेरिकी तळावर हल्ला; 30 ठार

1746

जनरल कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेताना इराणने अमेरिकेच्या बगदादमधील लष्करी तळावर 22 क्षेपणास्त्र्ाs डागली. या हल्ल्यात अमेरिकेचे 30 ते 80 सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आखातामध्ये युद्धाचे ढग आणखी गडद झाले असून, कोणत्याही क्षणी भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकेने आखातात होणारी विमान वाहतूक बंद केली आहे. हिंदुस्थानसह अनेक देशांनी आपल्या विमान कंपन्यांना इराण, इराकचा हवाईमार्ग टाळण्याचा आदेश दिला आहे.

अमेरिकन हवाई दलाने 3 जानेवारीला बगदाद विमानतळाबाहेर ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र्ा हल्ला करून इराणच्या कुद्स फौजचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी यांना ठार केले. या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड खळबळ माजली. सोमवारी (दि. 6) अमेरिकेचा बदला घेण्याचा इशारा इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खोमेनी यांनी दिला आहे. इराण-अमेरिका यांच्यातील तणावाचे पडसाद जगभर उमटत आहेत. कच्च्या तेलाचे दर भडकले असून, पेट्रोल-डिझेलचे दर सर्वत्र वाढले आहेत. जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू आहे. बुधवारी इराणने सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेताना इराकमधील बगदाद येथे अमेरिकन लष्करी तळावरच 20 क्षेपणास्त्र्ाs डागल्याने युद्धाचे ढग गडद झाले आहेत.

क्षेपणास्त्रे डागली
इराकमध्ये बगदाद येथे अमेरिकेचा अल्-असद हवाईतळ आहे. अमेरिकेचे सहा हजारांवर सैनिक येथे आहेत. इराणने आज येथे क्षेपणास्त्रे डागली. 22 मिसाइल्सद्वारे हल्ला केल्याचा दावा इराण सरकारने केला आहे. 30 ते 80 अमेरिकन सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्षेपणास्त्र्ा हल्ला झाल्याचे मान्य केले. मात्र, एकही सैनिक ठार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इस्रायल, सौदी अरेबियाची भूमिका महत्त्वपूर्ण
इराण थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची शक्यता कमी आहे. पण इराणभोवती अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत. या तळांवर इराण हल्ले करू शकते. तसे झाल्यास अमेरिकाही तेहरानसह इराणच्या अनेक भागांत हल्ले करेल, अशी शक्यता आहे. इराणच्या एका बाजूला पाकिस्तान, तर दुसरीकडे इराक आणि सौदी अरेबिया, इस्रायल आहे. हे सर्व अमेरिकेचे मित्र देश आहेत. या मित्रांच्या मदतीने अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया आणि इस्रायल काय भूमिका घेतात हे महत्त्वपूर्ण आहे.

अमेरिकेच्या दादागिरीविरोधात आम्ही नेहमीच संघर्ष केला आहे. क्षेपणास्त्रांचा हल्ला यशस्वी ठरला असून, अमेरिकेचा अहंकाराला थप्पड लगावली आहे. जनरल सुलेमानी यांचे बलिदान इराण कधीही विसरणार नाही. आम्ही आणखी बदला घेऊ- आयातुल्लाह खामेनी

इराणवर आणखी आर्थिक निर्बंध लादू – ट्रम्प
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एकही अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झालेला नाही. लष्करी तळाचे नुकसान झाले आहे, असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केला. मी जोपर्यंत अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत इराणला अण्वस्त्र्ा बनवू देणार नाही. इराणने अण्वस्त्र्ा कार्यक्रम सुरू ठेवलाच तर आणखी आर्थिक निर्बंध लादू, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

अनेक देशांनी हवाईमार्ग बदलला
स्फोटक परिस्थितीमुळे अमेरिकेने आपल्या विमान कंपन्यांना इराण, इराकसह आखाती देशांमध्ये जाणारी सर्व विमाने रद्द करण्याचा आदेश दिला आहे.

फ्रान्स, ब्रिटन, रशिया, इस्रायल, पोलंड, जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, व्हिएतनाम, हाँगकाँग आदी देशांच्या विमान कंपन्यांनीही इराण, इराकचा हवाईमार्ग टाळला आहे.

हिंदुस्थानी विमान कंपन्यांनी इराणचा हवाईमार्ग टाळून पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना दिली आहे. इराणचा हवाईमार्ग तात्पुरता टाळण्यास सांगितले आहे, अशी माहिती ‘एअर इंडिया’चे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी दिली.

इस्रायलवर हल्ला केला तर इराणला चिरडून टाकू – नेतान्याहू
‘अमेरिका आणि इस्रायल हे सख्खे मित्र आहेत. त्यामुळे इराणने आमच्या नादाला लागू नये. इस्रायलवर हल्ला केला तर आम्ही इराणला चिरडून टाकू. जोरदार प्रहार करू,’ असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. ‘अमेरिकन हवाई दलाने इराणचे जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारले हे चांगलेच केले. सुलेमानीने अनेक निरपराध लोकांना ठार केले होते. सुलेमानीला मारल्याबद्दल जगाने ट्रम्प यांचे अभिनंदन करायला पाहिजे,’ असे नेतान्याहू म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या