इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे संरक्षणमंत्री आणि रिव्हलोशनरी गार्ड कमांडर ठार; रॉयटर्सचे वृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर जनरल मोहम्मद पाकपूर आणि इराणी संरक्षण मंत्री अमीर नासिरजादेह हे शनिवारी सकाळी इराणमध्ये इस्रायली हल्ल्यात मारले गेले, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

इस्रायली अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, पाकपूर, नासिरजादेह आणि इराणच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. शनिवारी सकाळच्या हल्ल्यात अनेक वरिष्ठ इराणी अधिकारी आणि लष्करी कमांडरना लक्ष्य करत हल्ले करण्यात आले. ज्यात सर्वोच्च नेते अली खामेनी आणि अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या निवासस्थआनाचाही समावेश होता. मात्र, या वृत्ताला इराणकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.