इरॉस इंटरनॅशनल ओटीटी पॉवरहाऊस निर्माण करणार

1283

इरॉस इंटरनॅशनल व एसटीएक्‍स एंटरटेन्‍मेंट हे एकत्रितपणे ग्‍लोबल एन्‍टरटेन्‍मेंट कन्‍टेन्‍ट, डिजिटल मीडिया व ओटीटी पॉवरहाऊस निर्माण करणार आहे.या दोघांच्या एकत्रित कंपनीचे नावन हे पब्लिकली ट्रेडेड एंटरप्राईज असेल. भांडवल रचना व अनुभवी व्‍यवस्‍थापन टीमसह जगातील सर्वात महत्त्वपूर्ण विकासात्‍मक बाजारपेठांमधील प्रि‍मिअम डिजिटल कन्‍टेन्‍टच्‍या वापराला चालना देण्‍यामधून लाभ घेण्‍याच्‍या उद्देशाने ही निर्मिती करण्यात येणार आहे.

• हॉलिवुडमधील जलदगतीने विकसित होणा-या स्‍वतंत्र मीडिया कंपनीसोबत आघाडीच्‍या हिंदुस्थानी चित्रपट स्‍टुडिओ व ओटीटी व्‍यासपीठाचा वापर करण्यात येणार आहे. या सहयोगाचे नाव इरॉस एसटीएक्‍स ग्‍लोबल कॉर्पोरेशन आणि एनवायएसईवर सार्वजनिकरित्‍या व्‍यापार करेल.
• अॅप्‍पल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनबीसी युनिव्‍हर्सल आणि गुगल/यूट्यूब यांच्‍यासोबत जागतिक स्‍तरावरील अद्वितीय धोरणात्‍मक व वितरण भागीदारीचा लाभ घेत व्‍यासपीठांवर मोठ्या प्रमाणात बॉलिवुड व हॉलिवुड प्रि‍मिअम कन्‍टेन्‍ट विकसित, निर्मित व वितरित करण्‍यासाठी अद्वितीय संसाधने व क्षमता असलेल्‍या अग्रगण्‍य जागतिक मीडिया कंपनीची निर्मिती.
• १८८ दशलक्षहून अधिक इरॉस नाऊ नोंदणीकृत युजर्ससह २६ दशलक्षहून अधिक देय भरलेले सबस्‍क्रायबर्स
• नवीनच स्‍थापन केलेल्‍या व्‍यवस्‍थापन मंडळामध्‍ये कार्यकारी सह-अध्‍यक्ष म्‍हणून किशोर लुल्‍ला, सह-अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी म्‍हणून रॉबर्ट सायमंड्स, मुख्‍य वित्तीय अधिकारी म्‍हणून अँड्र्यू वॉरेन, सह-अध्‍यक्ष म्‍हणून रिशिका लुल्‍ला सिंग व नोह फोगलसन आणि कॉर्पोरेट स्‍ट्रॅटेजीचे प्रमुख म्‍हणून प्रेम परमेश्‍वरन यांचा समावेश

आपली प्रतिक्रिया द्या