गरज नसतानाही डेंटिस्टकडे का जावे?

dentist-new

dr-mahesh-kulkarni-Dentistडॉ. महेश कुलकर्णी ठाण्यातील नामवंत दंत-चिकित्सक आणि एमके स्माईल्स डेंटल क्लिनिकचे संस्थापक आहेत. त्यांनी MDS (Orthodentics) शिक्षण घेतले आहे. Dental Implantology मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते आपल्या कौशल्याचं योगदान देतात.

आपण सर्वसामान्य लोकांमध्ये बऱ्याचवेळा अशी विचारसरणी पाहतो की दात दुखल्याशिवाय, तोंडाला दुर्गंध आल्याशिवाय, दात दुखल्याशिवाय, दात पिवळे पडल्याशिवाय, हिरड्यांमधून रक्त आल्याशिवाय आपणांस डेंटिस्डकडे जाण्याची आवश्यकता नाही. पण याच गैसमजामुळे (ह्या चुकीच्या विचारसरणीमुळे) छोटा आजाराचे रूपांतर कठीण व खर्चिक ईलाज असलेल्या आजारांमध्ये होते व ही गोष्ट टाळण्यासाठी आपण किमान 3 महिन्यातून एकदा आपल्या “फॅमिली डेंटिस्ट” ची भेट घेणे अगत्याचे ठरते. असे केल्याने आवश्यक असणाऱ्या बाबी वेळोवेळी समोर येतात व ती कोणत्याही प्रकारचा आजाराची सुरुवात असल्या कारणाने त्याचा इलाज त्वरित व सोप्या पद्धतीने करता येतो. त्याचप्रमाणे “Oral Cancer” सारखे मोठे आजार व त्याची लक्षणे वेळीच समोर येतात आणि त्याचा इलाज करणे सोपे जाते.

काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार 100 पैकी 90 लोकांना वेगवेगळ्या दातावर उपचाराची गरज असते. हे प्रमाण लक्षत घेता आपण गरजू लोकांमध्ये असण्याची शक्यता फार वाढते. या पार्श्वभूमीवर दातांची निगा राखण्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे आवश्यक ठरते.

लहान मुलांना (वय वर्ष <15) विचारात घेता त्यांची दात तपासणी शाळांमार्फत होणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच मुलांची दातांचीवाढ योग्य पद्धतीने होत नसल्याने त्यांचे दात वेडेवाकडे येतात. ही बाब त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे ठरते. असे न झाल्यास पुढील काही काळात अशा मुलांना “Orthodontics treatment ” ला समोर जावे लागते. ह्या उपचाराचा कालावधी सुमारे 1 ते 3 वर्षे एवढा असतो. अल्पवयात निदान झाल्यास ही treatment टाळता येऊ शकते. परंतु शाळांमधून अशा प्रकारची दंत शिबीरे होत नसल्यामुळे आपल्या मुलांना दर महिन्यातून एकदा डेंटिस्टकडे घेऊन जाणे आवश्यक आहे.

dentist

वयोवृद्ध लोकांचा विचार केल्यास बऱ्याच वेळा असे लक्षात येते की दात पडून गेल्यानंतर देखील त्या जागी नवीन दात बसवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा उपचार केला जात नाही. हा कालावधी फार मोठा असल्यास नवीन दात बसवण्याचे मार्ग बंद होऊ शकतात आणि त्यामुळे म्हातारपणात कवळीचा आधार घ्यावा लागतो. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उतारवयात देखील कवळी न वापरता विविध प्रकारचे उपचार घेऊन व्यवस्थितपणे जेवता येते आणि म्हणूनच वयोवृद्ध लोकांची विविध दंतचिकित्सा-शिबिरांमार्फत दातांची चिकित्सा होणे आवश्यक आहे.

वय वर्ष 25-50 या वयोगटासाठी देखील दंतचिकित्सा तेवढीच महत्वाची आहे. या वयोगटात दातांचे काम हे केवळ जेवण्यासाठी नसून ते तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मोलाचे योगदान देते. काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार सुंदर स्मितहास्य असलेल्या मुला-मुलींमध्ये आत्मविश्वासाचे प्रमाण लाक्षणिकरित्या अधिक आढळून आले आहे. याचा विचार करता व्यक्तिमत्व विकासासाठी हास्य सुंदर असणे किती आवश्यक आहे हे लक्ष येते. म्हणूनच विविध उपक्रमांद्वारे या वयोगटातील सुद्धा लोकांची दंत तपासणी तसेच दंत समस्यांबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे.

टूथपिकचा वारंवार वापर धोक्याचा ठरू शकतो, वाचा योग्य पर्याय!

आपली प्रतिक्रिया द्या