टूथपिकचा वारंवार वापर धोक्याचा ठरू शकतो, वाचा योग्य पर्याय!

men-toothbrush

dr-mahesh-kulkarni-Dentist

>> डॉ. महेश मधुकर कुलकर्णी (Mob: 7045909009)
डॉ. महेश कुलकर्णी ठाण्यातील नामवंत दंत-चिकित्सक आणि एमके स्माईल्स डेंटल क्लिनिकचे संस्थापक आहेत. त्यांनी BDS, MDS (Orthodontics – Gold Medalist) शिक्षण घेतले आहे. Dental Implantology मध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते आपल्या कौशल्याचं योगदान देतात.

दातात अन्न अडकण्याचा त्रास दहा मधल्या आठ जणांना होत असतो. मात्र त्यावर वारंवार टूथपिकचा वापर हा कधी धोक्याचा ठरू शकतो. बाजारात अन्य पर्याय देखील उपस्थित आहे. मात्र त्याबद्दल अनेकांना माहिती नसते. दातांच्या समस्येबाबत विविध वयोगटातील रुग्णांची तपासणी करत असताना आणखी एक बाब लक्षात येते ती म्हणजे “ब्रश” करण्याबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम! पुरेशी माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये ब्रश करण्याबाबत खूप गैरसमज आहेत. याच विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करीत आहोत.

1) कोणता ब्रश वापरला पाहिजे?

toothbrush

साधारणतः सर्वांना वापरण्यास योग्य असा ब्रश म्हणजे (कोणत्याही कंपनीचा) “सॉफ्ट ब्रश”. हा ब्रश स्वयंचलित आणि मॅन्युअल या दोन्ही पैकी कोणत्याही प्रकारचा असू शकतो. तसेच ब्रश खरेदी करताना त्यावर दिलेल्या सूचना एकदा वाचून बघणे आवश्यक असते. या मध्ये तो ब्रश कोणत्या वयोगटासाठी आहे याची नोंद केलेली असते. नवीन खरेदी केलेला ब्रश हा 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ वापरू नये. ब्रश खराब झाला आहे असे वाटल्यास तो ब्रश त्या आधीच बदलून टाकावा. लहान मुलांसाठी (12 वर्षांखालील) बाजारात (pedo brush ) उपलब्ध आहेत. हेच ब्रश वापरले जावेत.

2) दिवसातून किती वेळा ब्रश करावा? तसेच किती कालावधी साठी करावा?

ब्रश दिवसातून दोन वेळा करावा. उठल्यानंतर तसेच रात्री जेवण झाल्यावर (झोपण्यापूर्वी). कालावधी- ब्रश करण्याचा कालावधी हा 2-3 मिनिटांपेक्षा जास्त असू नये. हिरड्यांच्या समस्या बहुतेक वेळा ब्रश खूप जास्त काळासाठी केल्यामुळे उद्भवतात आणि म्हणूनच कालावधीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

3) ब्रश करण्याची पद्धत ब्रश कसा करावा याचे मार्गदर्शन खालील व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे. या व्हिडिओ मधील पद्धत ही केवळ वय 15 ते 55 वर्ष या वयोगटासाठी आहे.

खालील व्हिडिओ मध्ये 55 वर्षांवरील वयोगटाच्या वापरण्याची पद्धत दाखवण्यात आलेली आहे.

4) जीभ कशाप्रकारे स्वच्छ ठेवावी?

जीभ स्वच्छ ठेवण्यासाठी ब्रशच्या मागील बाजूचा वापर करावा. त्याचप्रमाणे ‘टंग क्लिनर’ देखील बाजारात उपलब्ध आहेत. ब्रश करताना प्रत्येक वेळी दातांसोबत जीभेची सफाई होणे आवश्यक असते. त्यामुळे मुख दुर्गंधी पासून बचाव होतो व ताजेतवाने वाटते.

5) प्रॉक्सा ब्रशबद्दल माहिती

दोन दातांमधील फटी वाढल्यामुळे बऱ्याच वेळा त्यामध्ये बारीक अन्नकण अडकून तोंडास दुर्गंधी येते. अडकलेले अन्नकण काढण्यासाठी बऱ्याच वेळा टूथपिकचा वापर केला जातो जे अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे हिरड्यांना जखमा होतात आणि इन्फेकशनचे प्रमाण वाढते. टूथपिक ऐवजी प्रोक्सा ब्रशचा वापर केल्याने हिरड्या स्वच्छ होतात आणि तसेच त्यांची झीज देखील होत नाही. हा ब्रश आपल्या रोजच्या ब्रश नंतर 1-2 मिनिटे वापरावा. हा ब्रश सर्व वयोगटातील लोकांसाठी वापरला जाऊ शकतो. बाजारात हा ब्रश सर्व मेडिकल स्टोअर्स मध्ये अगदी सहजपणे उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी पुढील पाहा-

या व्यतिरिक्त काही अजून प्रश्न अथवा शंका असल्यास अवश्य संपर्क साधावा.

संपर्क:
Mob: 7045909009
Email: [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या