हनीट्रॅपमध्ये लष्कराचा निवृत्त अधिकारी, वेल्लोर येथून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूतील वेल्लोर येथे लष्कराची गुप्त माहिती अनोळखी महिलेला पाठवल्याप्रकरणी 52 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.  बाबू असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. बाबूवर लष्कराशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती लीक केल्याचा आरोप आहे.

 कनियामबाडी पोलिसांच्या माहितीनुसार, बाबूने व्हॉट्सऍपद्वारे एका अनोळखी महिलेला लष्करी उपकरणे आणि लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाठवली. बाबू हा वेल्लोरमधील किझवल्लम गावचा रहिवासी आहे. त्याने 28 वर्षे लष्कराच्या विविध शाखांमध्ये सेवा बजावली आहे. गेल्या वर्षी त्याने लष्कराच्या इक्विपमेंट डिव्हिजनमधून कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो आपल्या गावात राहू लागला. गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या बाबूच्या हालचालींवर लष्करी अधिकाऱ्यांना संशय आला. केंद्रीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी बाबूला 23 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.