
महिला असो वा पुरुष आपल्या प्राइव्हेट पार्टची स्वच्छता राखणे हे खूप महत्त्वाचे आहे. विशेषतः महिलांनी त्यांच्या प्राइव्हेट पार्टची विशेषतः काळजी घेणे गरजेचे आहे. योनीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास, महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडावे लागते. सध्याच्या घडीला बहुतांशी महिला या त्यांचे प्राइव्हेट पार्ट स्वच्छ करण्यासाठी इंटिमेट वॉशचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न अनेकदा उद्भवतो की, मासिक पाळी दरम्यान इंटिमेट वॉश वापरणे सुरक्षित आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया.
मासिक पाळीच्या समस्यांनी त्रस्त आहात? दिवसातून किमान एक केळं खा, सर्व प्राॅब्लेम होतील दूर!
मासिक पाळी दरम्यान इंटिमेट वॉश वापरू शकतो का?
इतर दिवसांपेक्षा मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. योनीमार्गाची स्वच्छता राखण्यासाठी अनेक महिला इंटिमेट वॉश वापरतात. पाळीच्या दिवसांमध्ये इंटिमेट वॉश वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योनीमार्ग स्वच्छतेसाठी दररोज इंटिमेट वॉश वापरणे सुरक्षित आहे. यामुळे योनीमार्गात होणारी खाज, कोरडेपणा आणि संसर्ग टाळण्यास मदत होते. मासिक पाळी दरम्यान असे कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी, मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.मासिक पाळीच्या वेळी साबण किंवा इंटिमेट वॉश सारखी उत्पादने वापरणे योग्य नाही. खरंतर, या उत्पादनांमध्ये रसायने असतात. यामुळे योनीची पीएच पातळी खराब करू शकतात. अशा परिस्थितीत, मासिक पाळी दरम्यान इंटिमेट वॉश वापरल्याने उच्च किंवा कमी पीएचमुळे योनीमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.

मासिक पाळी दरम्यान योनीची स्वच्छता कशी ठेवावी?
योनीची स्वतःची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया असते. योनीमध्ये काही निरोगी बॅक्टेरिया असतात, जे कोणत्याही बाह्य संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. मासिक पाळीच्या दरम्यान योनीमार्ग स्वच्छ करण्यासाठी कोमट पाणी वापरले जाऊ शकते. याशिवाय, जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान वास किंवा चिकटपणा जाणवत असेल तर, कोणताही सौम्य साबण किंवा इंटिमेट वॉश वापरू शकता. पण यासाठी तुम्ही प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)






























































