
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. या पाच वर्षांमध्ये विद्या गरोदर असल्याच्या अनेकदा बातम्या आल्या आहेत. मात्र प्रत्येकवेळी विद्याने ‘तसे’ काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. नुकतीच विद्या बालन एका पार्टीसाठी तिच्या नवऱ्यासोबत आली होती. त्या पार्टीतील विद्याचे एकंदरीत वावरणे पाहून अनेकांना ती गरोदर असल्याची शंका आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बि टाऊनमध्ये विद्याच्या प्रेग्नेन्सीवर जोरदार चर्चा रंगली आहे.
विद्या एका पार्टीसाठी नवऱ्यासोबत आली होती. त्या कार्यक्रमात तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. विद्याची शरीरयष्टी स्थूल असल्याने सुरुवातीला उपस्थितांना तिच्यात काही वेगळे जाणवले नाही. मात्र ती तिच्या ओढणीने सतत तिचे पोट झाकायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे विद्या गरोदर आहे की काय अशी चर्चा त्या पार्टीमध्ये रंगली होती. मात्र खरंच विद्या प्रेग्नेंट आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
याआधी देखील तुम्हारी सुलू या चित्रपटासाठी विद्याने वजन वाढवले होते. त्यामुळे तेव्हा देखील विद्या गरोदर असल्याची चर्चा रंगली होती.























































