
हिंदुस्थानातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अंबानी कुटुंबाचे खेळ जगतात महत्त्वाचे योगदान आहे. क्रिकेट ते फुटबॉल आणि ऑलिम्पिक खेळांच्या प्रचारात अंबानी कुटुंबाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नीता अंबानी यांचे क्रीडा प्रेमही लपून राहिलेले नाही. आता त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचीही क्रीडा जगतात एन्ट्री झाली असून आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरशेनच्या प्रशासकीय मंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरेशनने 10 एप्रिल रोजी ईशा अंबानी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. 2024 ते 2028 ऑलिम्पिक सायकलसाठी त्यांचा एफआयव्हीबीने प्रशासकीय मंडळात समावेश केला असून त्यांच्यासह तीन वेळच्या ऑलिम्पिक चॅम्पियन लुई बाऊडॉन यांनाही यात स्थान देण्यात आले आहे. ते एफआयव्हीबी एथलीट्स कमिशनचे अध्यक्षही आहेत.