
पनवेलच्या ईशान कुंभार या पहिलीतील विद्यार्थ्याने पंजाबच्या अमृतसर येथे नुकत्याच झालेल्या थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सात ते नऊ वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावले. अमृतसर येथे 16 वी राष्ट्रीय थाय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, हैदराबाद, दिल्ली, छत्तीसगढ, तेलंगणा या राज्यातील तब्बल 150 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात युनायटेड शुटोकॉन कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. ईशान पुंभारला रोहित थाली यांचे मार्गदर्शन लाभले. तो नवीन पनवेल येथील डीएव्ही स्कूलचा विद्यार्थी आहे. सुवर्णपदक पटकावल्याने ईशानची आशियाई स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.


























































