आयएसआयच्या संशयित एजंटाला वाराणसीत अटक

271

उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) वाराणसी येथून आयएसआयच्या एका संशयित एजंटाला अटक केली. त्याने येथील सैन्य परिसरातील फोटो घेतले होते आणि ते पाकिस्तानला पाठविण्याच्या प्रयत्नात होता. त्याने या भागात फिरून सीआरपीएफच्या इमारतींची रेकीही केली होती. राशीद अहमद असे त्याचे नाव असून एटीएस अधिकाऱ्यांना त्याच्याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून त्याच्यावर नजर ठेवून त्याला बेडय़ा ठोकण्यात आल्या. राशीद उत्तर प्रदेशातील चंदौली जिह्याचा रहिवासी आहे. अटकेनंतर आता गुप्तचर अधिकारी आणि एटीएसचे अन्य अधिकारी त्याची कसून चौकशी करत आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस त्याबाबतची माहिती जाहीर करणार आहेत असे कळते.

आपली प्रतिक्रिया द्या